Milk

₹ 66 0% off
₹ 0

दुध हे पौष्टिकतेची मोठी संपन्न खाण आहे. उच्च दर्जाची प्रथिने आणि जीवनसत्त्व 'ब' च्या व्यतिरिक्त दुधात कॅल्शियम, जीवनसत्त्व 'ड' असते जे हृदय सुदृढ राखतात आणि आपले वजन सुद्धा नियंत्रित ठेवण्यात मदत करतात. दुधामध्ये पोटॅशियम फॉस्फरस, मॅग्नेशियम, अँटीऑक्सीडेंटससुद्ध असतात. यामुळे हाडे आणि दात अतिशय मजबूत राहतात.दुधामध्ये कॅल्शियम, जीवनसत्त्व 'ड', फॉस्फरस, मॅग्नेशियम यांसारखे घटक असतात. हे सर्व घटक हाडे मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. एका संशोधनाच्या अनुसार दुध पायल्याने हाडांमध्ये फ्रॅक्चर होण्याची शक्यता सुद्धा खूप कमी असते. सगळ्यात महत्त्वाचा फायद म्हणजे दुध जास्त प्यायल्याने दात अतिशय मजबूत होतात. जर तुम्ही दुध पिण्यास टाळाटाळ करत असाल तर या दोन फायद्यांना डोळ्यासमोर ठेवून तुम्ही दुधाचे सेवन आवर्जून केले पाहिजे.